औरंगाबाद : कोरोनाच्या संकटाचा फायदा करुन घेत व सर्व कुटुंबीयांचे आरोग्यावरील प्रयत्न वाढविले. तसेच आहार अधिक सकस केला. घरातीच्या बागेत अनेक भाज्या, फुले यांची लागवड केली, त्यातुन मानसिक समाधान व आरोग्य सुधारले. रोज केवळ १० मिनीटांशिवाय बातम्या, टिव्ही बघत नाही. वैयक्तिक छंदासाठी वेळ देत असल्याने कुठलाही तणाव नाही. हा अनुभव सांगत आहेत, औरंगाबादचे रहिवाशी व लंडनमध्ये वास्तव्यास असलेले राहुल करुरकर.
राहुल करुरकर हे लंडनमधे मागील १५ वर्षापासुन एका फायनान्स कंपनीत आहेत. पत्नी अनघा व ईशान, आरा ही दोन मुलं असे हे कुटूंब रिकमन्सवर्थ भागात स्थायीक आहे.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
वेळेचा उपयोग करा
राहुल करुरकर म्हणाले की, दररोज वेळ मिळत नाही म्हणुन रडगाणं गाणाऱ्यांनी कोरोना साथीच्या संधीचे सोने करावे. प्रशासनाने घातलेल्या निर्बंधात राहुन वेळेचा उपयोग स्वतःची प्रगती करण्यात व नात्यांमधील पडलेल्या आढ्या उकलण्यात करावा. जुन्या मित्रांना किंवा पुर्वी तुम्हाला कुणी मदत केली त्या स्नेहीना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फोन करावा. कृतज्ञतेने भरलेले मन हे ताण रहीत, प्रसन्न असते. भारतीय प्रधानमंत्री मोदींनी केलेला घंटानाद त्याच भावनेतुन होता. तोच आदर्श ठेवत ब्रिटेनमधे दर गुरुवारी रात्री ८ वाजता सर्व जनता दाराशी येऊन सर्व मेडिकल कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवुन कृतज्ञतापुर्वक आभार मानते.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
असा पसरला कोरोना
कोरोना युके मधे खरा पसरला तो मार्चच्या सुरवातीला. लंडन हे मोठे व्यावसायीक शहर असल्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणात रोग पसरणार. युरोपमधून प्रवास करणारे बरेच असल्यामुळे कोरोना लागण होणे व साथ पसरणे अपेक्षित होतेच. युकेमधे १२ एप्रिल पर्यंत १०,००० लोकांचा मृत्यु झाला आहे. सरकारी अंदाजानुसार १२ एप्रिल पर्यंत साधारण ५.५ लाख लोकांना याची देशात लागण झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
मृत्यु शारीरीक आजारांमुळेच
बहुतांश लोकांचा मृत्यु काही ना काही इतर शारीरीक आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्तिचा अभाव किंवा श्वसन मार्गाची क्षमता कमी असल्याने झाला आहे. कोरोनाचे मृत्युच्या अधिकांश केसेस मधे ६०-७० वयाचे किंवा त्यापलिकडील जास्त वयाचे माणसे आहेत. सुरवातीस सरकारने सर्वांना लागण होईल व जास्त मृत्यु होणार नाहीत हा होरा बाळगुन कुठलिही उपाययोजना केली नाही. नंतर ईटलीचे मृत्युचे प्रमाण पाहुन ब्रिटिश सरकारने पुर्ण लाँकडाऊन व शाळा बंद करण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
चार हजार व्हेंटीलेटर
ब्रिटिशच काय परंतु सर्व देशांमधे अश्या साथीस लढण्याची वैद्यकिय सामग्री नसते. संपुर्ण ब्रिटिश देशात केवळ चार हजार व्हेंटीलेटर सध्या अनेक सेवाभावी संस्था आजारी लोकांना मदत करत आहेत. लोक अन्न खरेदीसाठी ८-१५ दिवसातुन एकदा दुकानात जातात. काही अज्ञानी युकेमधेही वेड्याप्रमाणे काही न झाल्यासारखे बेदरकारपणे फिरतात. परंतु पोलिस त्यांना केवळ आर्थिक दंड आकारतात. भारतासारखे इथे पोलिसांना दंडुके मारता येत नाहीत. इतर प्रगत देशाच्या मानाने, भारतीय प्रशासन ही परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळत आहे. त्यात सरकारचे टेस्ट करण्याचे प्रमाण वाढवले जात आहे. प्रशासनाने घातलेले निर्बंध नागरीकांनी प्रामाणिकपणे पाळले तर हे संकट लवकरच टळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.